कोकणातील रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाविरोधात गेले दोन दिवस झाले आंदोलन सुरू आहे. दरम्यान या आंदोलनात सहभागी झालेल्या २५ महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत ( Uday Samant) यांनी दिली असून काही महिलांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे. परंतु तरीदेखील आंदोलनकर्ते आपल्या मतावर ठाम आहेत.
राजकीय वर्तुळात नवीन ट्विस्ट! मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आणखी एका नवीन नेत्याची वाढ…
एवढंच नाही तर राजापूरमधील एका महिलेने ‘जीव गेला तरी येथेच थांबेन’ असे ठामपणे सांगितले आहे. ‘आम्हाला पैसे नकोत आमच्या जमिनी द्या’ असा येथील आंदोलनकर्त्यांचा सूर आहे. कोकणातील राजापूर बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारा एक प्रकल्प प्रस्तावित आहे. ( Local people oppose to refinary survey)
Ajinkya Rahane: एम एस धोनीने अजिंक्य रहाणेचे नशीब फिरवले, टिम इंडियाने घेतला मोठा निर्णय!
‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग’ असे या प्रकल्पाचे नाव आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड व हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प प्रस्तावित केला गेला आहे. या रिफायनरीला स्थानिक लोकांनी विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे लोकांनी विकत घेतलेल्या जमिनी धोक्यात येतील. तसेच सागरी जैवविविधतेवर परिणाम होऊ शकतात. यामुळे आंदोलकांनी ही मागणी केली आहे. ( Ratnagiri Refinary Project Survey)