“आपण कोणालाच घाबरत नाही पण…”; शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी दिली प्रतिक्रिया

"We fear no one but..."; Chandrakant Patil reacted after the spitting incident

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते चांगलेच चर्चेत आले आहेत. यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अशातच आता चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला आहे. आता यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे

आली लहर केला कहर! उर्फी जावेदने चक्क सायकलच्या चेनपासून बनवला ड्रेस; पाहा VIDEO

चंद्रकांत पाटील म्हणाले, “आपण कोणालाच घाबरत नाही. मात्र मी दिलगीरी व्यक्त करून देखील शाईफेक करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमाला धक्का लावत आहे” असं यावेळी ते म्हणाले आहेत.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या भोवती अंगरक्षक असून देखील कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर शाई फेकून हल्ला केलाय. चिंचवड गावामध्ये ते एका कार्यकर्त्याच्या घरी गेले असता त्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला आहे.

आली लहर केला कहर! उर्फी जावेदने चक्क सायकलच्या चेनपासून बनवला ड्रेस; पाहा VIDEO

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील म्हणाले, “ पहिल्या काळात शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीदेखील महापुरुषांनी शाळा उघडल्या. पण, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहत आहेत. त्याकाळी महापुरुषांना सरकारनं शाळा सुरु करण्यासाठी अनुदान दिले नाही, त्यांनी लोकांकडं भीक मागितली”.

‘सैराट’वर अनुराग कश्यप यांची टीका; म्हणाले, “सैराटने मराठी चित्रपट सृष्टीला…”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *