मुंबई : मुंबईत याकूब मेमनच्या (Yakub meman) कबरीचं सुशोभिकरण केल्याचा मुद्दा राजकीय वर्तुळात चांगलाच जोर धरत आहे. याप्रकरणी याकूब मेमनच्या कबरीच सुशोभिकरण हे महाराष्ट्रासाठी (Maharashtra) दुदैवी अशा प्रकारचे आरोप करण्यात येतं होते. दरम्यान जिथे ही कबर आहे त्या कब्रिस्तानच्या ट्रस्टींनी स्पष्ट केलं आहे की, कोणतंही सुशोभिकरणाचं काम याकूबच्या कबरीवर झालं नाही. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘या’ दिवशी ‘अतिवृष्टीग्रस्त’ शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार पैसे जमा; मदतीसाठी जीआर निघाला
महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळी याकूब मेमनला फाशी देण्यात आली त्या काळीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. “मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांना कोण कोण संरक्षण देतं हे आम्ही पाहिलं आहे. त्यांचे साथीदार अजूनही जेलमध्ये बसले आहेत, ज्यांना मंत्री बनवलं गेलं”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे सरकारवर टीकास्र सोडलं आहे.
पुढे फडणवीस म्हणाले की, “सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो कारण आमच्या सरकारमध्ये हिंमत होती. आम्ही रात्री २ वाजता सर्वोच्च न्यायालय उघडून सुनावणी घेतली. आणि त्यानंतर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला फाशी दिली गेली. आस कुणाच्या काळात झालंय तुम्हाला माहिती आहे.”
सर्दी – खोकला झालाय? मग करा ‘हे’ घरगुती उपयोग, मिळेल झटपट आराम
वादाची सुरुवात कशी झाली?
याकूब मेमनच्या कबरीचे फोटो ट्वीट करत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. याकूब मेमनच्या कबरीचं उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने सुशोभिकरण झालं का? असा सवाल राम कदम यांनी ट्वीटमध्ये उपस्थित केला होता. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला.
कब्रस्तानचे ट्रस्टी शोएब खातिब यांचे स्पष्टीकरण
याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण केल्याच्या वादावर कब्रस्तान ट्रस्टचे ट्रस्टी शोएब खातिब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शोएब खातिब म्हणाले की, “कबरीचे सुशोभीकरण केल्याच्या बातमीत कोणतंही तथ्य नाही. याकूब मेमनच्या कबरीसाठी मार्बल, लाईट लावण्यात आले. कारण ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मोठ्या कब्रिस्तानांमध्ये अनेक कबरींवर अशा प्रकारे मार्बल लावलं जातं. आणि लाईट लावलेला जो व्हिडीओ आपण पाहात आहात ज्यावरून येवढा वाद झाला तो व्हिडिओ रमजानच्या ‘बडी रात’च्या वेळेचा आहे. शब-ए-बारातच्या वेळी गेल्या तीन वर्षांत कोविडमुळे हे काहीच होऊ शकलं नाही. त्यामुळे यावेळी मुंबईतल्या सर्वच कब्रिस्तानांमध्ये हे केलं गेलं आहे”, असं ते म्हणाले आहेत.
राज्यात हजारो जनावरांना लम्पी आजाराची लागण, पशुवैद्यक झाले सतर्क