मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यापासून शिवसेनेचे ठाकरे व शिंदे असे दोन गट पडले. या दोन्ही गटांमध्ये शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण कुणाचा ? यावरून वाद सुरू आहेत. याबाबत काल निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती. मागील अनेक दिवसांपासून रखडलेला हा निर्णय किमान कालतरी होईल म्हणून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र कालही शिवसेना व धनुष्यबाण नेमका कुणाचा ? यावर निर्णय झाला नसून याबाबतची सुनावणी पुढे ढकलली गेली आहे. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
पुन्हा एकदा सुनावणी लांबणीवर! ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचं काय होणार?
आदित्य ठाकरे म्हणाले, एका व्यक्तीच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तारीख पे तारीख सुरूच राहणार आहे. यांच्या कागदपत्रांमधील सत्यता निवडणूक आयोगाने तपासावी असे ते म्हणाले. त्याचबरोबर आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, आम्हाला आशा आहे की विजय हा सत्याचा होईल, अस देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
धक्कदायक! शिक्षकाने विद्यार्थीनीला कॉपीगर्ल म्हण्टल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
दरम्यान, सोमवारी 23 जानेवारी रोजी शिंदे व ठाकरे गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. या दोन्ही गटांकडून लेखी उत्तरं मिळाल्यानंतर निवडणूक आयोग पुढील सुनावणी ३० जानेवारीला करणार आहे.
राज ठाकरेंचे मिशन महानगरपालिका! निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज ठाण्यात दुसरा दौरा