मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबई मेट्रो ३ च्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवलाय. यावेळी जोरदार एकनाथ शिंदेनी राजकीय टोलेबाजी केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्हाला बॅटिंग करायला पूर्ण वेळ नाही. आमच्याकडे अडीच वर्षेच आहेत. त्यामुळे आम्हाला कमी बॉलवर जास्त रन काढायचे आहेत,” आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश (Mahesh Tapase) तपासे यांनी टोला लगावला. “कमी चेंडूत जास्त धावा करायच्या नादात हे ईडी सरकार लवकरच ‘धावबाद’ होईल”.
महेश तपासे म्हणाले, “कमी चेंडूत जास्त धावा करायच्या नादात असल्याची कबुली मुख्यमंत्र्यांची दिली. त्यामुळे विश्वासघाताच्या आधारावर स्थापन झालेलं शिंदे सरकार जास्त काळ टिकेल, असं वाटत नाही”.
Urfi Javed: सेक्सबद्दल प्रश्न विचारताच भडकली उर्फी जावेद, म्हणाली…
दरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले होते की, “अश्विनी भिडे मुंबई मेट्रोचं काम पाहत आहेत. काम करणारा आणि स्वतः कामात झोकून देणारा अधिकारीच सरकारचं काम लोकांपर्यंत पोहचवत असतो. नाहीतर एखादा प्रकल्प सुरू आहे आणि फक्त चाललंय म्हणून चाललंय असं नाही, सरकारी काम आणि सहा महिने थांब असं आम्हाला करायचं नाही. तर आम्हाला कमी वेळेत जास्त करायचंय”.