
मुंबई : आज नितीश कुमार ( Nitish Kumar ) यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. तर तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्री पद मिळालेले आहे. (tejaswee yadav) सर्वच प्रादेशिक पक्ष संपतील. फक्त भाजप राहील. शिवसेनाही संपुष्टात येईल असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केले होते. यावरुनच आता नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे.
काही लोकांना वाटतं विरोधी पक्ष संपुष्टात येईल. पण आता आम्हीही विरोधी पक्ष आहोत. 2014 मध्ये आलेले 2024 मध्ये राहतील तर ना? आम्ही राहू, न राहू, पण 2024मध्ये ते राहणार नाहीत, अस वक्तव्य मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेले आहे. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावं असं मी आवाहन करत आहे, असे देखील ते म्हणालेले आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील नड्डा यांच्यावर जोरदार टीका केली होती. भाजप मित्र पक्षांना संपवण्याचं काम करत असून प्रकाश सिंह बादल यांच्यासोबत देखील असंच झालं आहे. शिवसेनेसोबत देखील तेच झालेले आहे. आता बिहारमध्येही असच होणार होतं. पण महाराष्ट्रात जे झालं, त्यामुळे नितीश कुमार सावध झाले. भाजपसोबत राहिल्यावर आपल्यासोबतही धोका होईल हे नितीश कुमार यांना कळून चुकलं. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा दिला आणि भाजपपासून वेगळे झाले, अस भाष्य त्यांनी केलेले आहे.
दरम्यान, लोकांना घाबरवणं आणि खरेदी करणं एवढंच भाजपला माहीत आहे. बिहारमध्ये भाजपचा अजेंडा लागू होऊ नये असं आम्हाला वाटत होतं. लालूप्रसाद यादव यांनी तर लालकृष्ण अडवाणी यांचा रथ रोखला होता. तसेच आम्ही कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही, अस वक्तव्य तेजस्वी यादव यांनी केलेले आहे.