
मुंबई : सध्या रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन (Nanar Refinery Project) वातावरण तापलं आहे. दरम्यान हा वाद इतका पेटला आहे की, रिफायनरी विरोधक जोशी नामक नेत्याने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (uday samant) यांना जाळून ठार मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना काल महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्या राजापूर दौऱ्याच्या वेळी घडली आहे.
Shinde-Fadnavis: शिंदे-फडणवीसांमध्ये रात्री उशिरा तब्बल पावणे 2 तास बैठक, ‘या’ विषयांवर चर्चा
धमकीचा हा व्हिडओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होत असून पोलिसांनी आता या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेचे गांभीर्य ओळखून रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी ना. सामंत यांच्यासोबत चर्चा केली असून आता याबाबत अधिक चौकशी केली जात आहे.
Maheep Kapoor: “लग्नानंतरही संजय कपूरने…”, महीप कपूरचा खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा!
“आम्ही आतंकवादी नाही, आम्ही सुद्धा मुंबईला असतो. कायदा नावाची काही गोष्ट आहे की नाही. त्या उदय सामंतला जाळून टाकू आम्ही. कोणीही कंपन्या उघडून टाकतो. काय माहिती देताय ते, २९०० एकरची मालकी आहे, आमच्या जागा, आमचे गाव आहे. उद्या आम्ही काही खपवून घेणार नाही. आमची जागा आम्हाला पाहिजे, पंचक्रोशी आम्हाला पाहिजे. मालकी बिलकी गेली खड्यात. जर कुणी आमच्या पंचक्रोशीत पाय ठेवला तर त्याचा पाय तोडून हातात देऊ.आणि जर या आंदोलनावर जर गोळीबार झाला तर याची पहिली गोळी, हा अप्पा जोशी घेईल, असंही हा धमकी देणारा रिफायनरी विरोधक म्हणाला.
Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या नियुक्तीबाबत अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत