
मुंबई : भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी जाहीर होऊन भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांना मुंबई (Mumbai) भाजपाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. आगामी निवडणुकीमध्ये मुंबई महानगर पालिकेत भाजपाचा महापौर असेल, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप देखील केले.
पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार म्हणाले, आता आमचं फिक्स ठरलं आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये आता आमचाच महापौर बसणार आहे. अपेक्षेनुसार मुंबईमध्ये भाजपाचं काम अजून गतीने वाढवणार आहे. तसेच मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुकीत यशस्वी परिणाम आणून देणारच, याची खात्रीसुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.
पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई आमचीच जहागिरी आहे, असं समजून मुंबई महानगर पालिकेत आणि मुंबईमध्ये भ्रष्टाचाराची केला आहे, त्याला तडीपार करण्याचं काम मी आणि आमचे सहकारी मिळून करू असं देखील आशिष शेलार म्हणाले