दौंड : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त खडकी येथे दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या हस्ते नवीन ग्रामसचिवालय कार्यालयाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम काल (१५ ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजता पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे (प्रदेशाध्यक्ष भा. ज.पा. किसान मोर्चा) हे देखील उपस्थित होते.
नवीन ग्रामसचिवालय कार्यालयाच्या भूमीपूजनाबरोबरच नागरी सुविधा अंतर्गत रस्ते, व्यायामशाळा, सभामंडप, तसेच पेविंग ब्लॉक यांचा देखील लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये वासुदेव नाना काळे यांनी “राहुल दादा कुल आणि मी तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले”. आमदार राहुल दादा कुल यांनी मागील अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना सुद्धा आपण 200 कोटींपेक्षा जास्त निधी आणण्यात यशस्वी झालो. आता आपले सरकार आले आहे त्यामुळे 2014 – 2019 प्रमाणेच विकास निधी उपलब्ध करू असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी तालुक्यातील पूर्ण झालेली विकास कामे याबद्दल देखील माहिती दिली.
या कार्यक्रमामध्ये , स्नेहल काळभोर (सरपंच), राहुल गुणवरे (उपसरपंच), संजय काळभोर (मा.जि.प सदस्य), महेश शितोळे (संचालक भीमा पाटस कारखाना), त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य मोहन काळभोर, जनार्दन कुदळे, सविता शितोळे, छबाबाई गुणवरे, दिपाली काळे, राणी आरेकर, उज्वला कुचेकर, ग्रामविकास अधिकारी सुधीर नेपते, विकास काळे, अनिल गुणवरे, बाळासाहेब गुणवरे, मुकेश गुणवरे, हरिभाऊ ठोंबरे, मच्छिंद्र काळभोर, सचिन काळभोर, मंगेश शितोळे, लक्ष्मण राधंवन त्याचबरोबर खडकीचे ग्रामस्थ उपस्थित होते.