
मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल आहे. यामुळे शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. पण आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. यावर अनेक राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत.
खुशखबर! आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देणार ‘इतकं’ अनुदान
बऱ्याच राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिला आहेत. पण सर्वांचे लक्ष उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) प्रतिक्रियेकडे लागले आहे. दरम्यान आता उद्धव ठाकरेंनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर केला. आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘जिंकून दाखवणारच’ अशी दोनच शब्दामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Eknath Shinde: सीएम शिंदेंवर आक्षेपार्ह टिप्पणी करणं भोवलं, 8 शिवसैनिकांची जेलमध्ये रवानगी
दरम्यान यावर आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) देखील प्रतिक्रिया दिली होती. ट्विट करत आदित्य ठाकरे म्हणाले होते की, “खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते!”
खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 8, 2022
लढणार आणि जिंकणारच!
आम्ही सत्याच्या बाजूने!
सत्यमेव जयते! pic.twitter.com/MSBoLR9UT5