औरंगाबाद ( Aurangabad) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शेतात गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा विहरीमध्ये पडून दुर्दैवी मृत्यु झाला आहे. एकाच घरातील दोन व्यक्तींचा अचानक मृत्यु झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
करोडपती शेतकऱ्यांच्या ‘या’ गावाबद्दल वाचून तुम्हीही व्हाल थक्क! फक्त एका पिकामुळे पालटले गावचे रूप
शेतात गेलेल्या या दोन्ही बहिणी मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होत्या. दरम्यान त्यांचा शोध घेतला असता शेताजवळील जुन्या पडक्या विहरीत त्यांचे मृतदेह आढळले आहेत. काल (ता. 16) दुपारी दोन वाजता दोन मृत मुलींचे मृतदेह सापडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड ( Kannad Taluka) तालुक्यातील स्वाती व शितल शनिवारी (ता.14) दुपारी गवत आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. हे गवत जुन्या पडक्या विहरीजवळ होते. परंतु, संध्याकाळ झाली तरी दोन्ही बहिणी घरी परतल्या नाहीत.
शिवसेना कुणाची? आज निर्णय होण्याची शक्यता; निवडणूक आयोग देणार महत्त्वाचा निर्णय
यामुळे नातेवाईकांनी शेतात गवत असलेल्या ठिकाणी जाऊन मुलींचा शोध घेतला. मात्र त्या दोघी सापडल्या नाहीत. दरम्यान त्यांच्या वडिलांनी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात मुली बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. दुसऱ्या दिवशी देखील मुलींचा शोध घेणे सुरूच होते. यावेळी शेजारच्या शेतातील विहरीमध्ये स्वाती व शितल तरंगताना दिसल्या. दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.