weather update today । सावधान! थंडी वाढणार, या ठिकाणी बर्फवृष्टी होण्याची शक्यता; जाणून घ्या या राज्यांचे हवामान

Weather Update Today

weather update today । दिल्ली-एनसीआरमध्ये थंडी वाढू लागली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे आजचे किमान तापमान 9 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मात्र, रात्री किमान तापमानात आणखी एक ते दोन अंशांची घसरण होऊ शकते. पंजाब आणि हरियाणाच्या विविध भागात आज सकाळी दाट धुके दिसले. येत्या दोन दिवसांत तामिळनाडू आणि केरळमधील विविध जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (weather update today)

Viral News । शार्कने केला तरुणाला गिळण्याचा प्रयत्न, पाय तुटला; धक्कादायक व्हिडीओ समोर

जम्मू-काश्मीरमध्ये आज हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांत आसाम, मेघालय, त्रिपुरा, उत्तर पंजाब आणि उत्तर हरियाणाच्या वेगवेगळ्या भागात सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. 18 डिसेंबरपासून मध्य प्रदेशातील अनेक भागांमध्ये किमान तापमान 2-3 अंश सेल्सिअसने घसरेल. पुढील 2 दिवसांत वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये रात्रीचे तापमान सुमारे 2 अंश सेल्सिअसने वाढेल.

Ola चे Krutrim AI मॉडेल तुमची भाषा बोलेल! ChatGPT – Google, Gemini साठी धोक्याची घंटा

काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा

शनिवारी काश्मीरच्या काही भागात पावसासोबत हिमवृष्टी झाली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोनमर्ग, झोजिला आणि गुलमर्गमध्ये सुमारे सहा इंच बर्फवृष्टी झाली असून पावसासोबत हिमवृष्टीचे वातावरण आज म्हणजेच रविवारीही कायम राहणार आहे. आज रात्री तापमानात १ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.

Priya Singh Case । बॉयफ्रेंडने पहिल्यांदा मारहाण केली, त्याच्या मित्रांनी ढकलले नंतर कारने चिरडण्याचा..” महिलेने सांगितला थरकाप उडवणारा अनुभव

Spread the love