Site icon e लोकहित | Marathi News

Wedding Viral Video । लग्नात पनीर वरून व्हराडात तुफान हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

Viral Video

Wedding Viral Video । भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये अनेकदा भांडणे पाहायला मिळतात,] सध्या देखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये सर्व व्हराडी एकत्र भांडताना दिसत आहेत आणि एकमेकांवर खुर्च्या फेकताना दिसत आहेत आणि त्यांच्या भांडणाचे कारण दुसरे तिसरे काही नसून मटर पनीर आहे. मटर पनीर करीमध्ये कमी पनीर असताना पाहुण्यांनी कसा राग व्यक्त केला हे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Ajit Pawar । “आम्ही सांगू तेच खरं”, अजित दादांचा पुन्हा राष्ट्रवादीवर दावा

मटर पनीरमधून पनीर गायब

ट्विटरवर घर के कलेश नावाच्या हँडलवर लग्नाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका टेबलावर जेवण ठेवले आहे आणि दुसऱ्या बाजूला खुर्च्या मांडल्या जात आहेत. वास्तविक, हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले होते- मेजवानीच्या वेळी देण्यात आलेल्या मटर पनीरमध्ये पनीरचे तुकडे नसल्यामुळे वधू-वरांच्या पाहुण्यांमध्ये वाद झाला. त्यामुळे लोकांचा संताप वाढला आणि लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली.

Curative Petition । मोठी बातमी! मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयाने घेतला सर्वात मोठा निर्णय

लग्नातील भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत 2 लाख 17 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. यावर मजेशीर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, तिसरे महायुद्ध फक्त पनीरसाठी होईल.

Ishan Kishan । भारतीय संघाला मोठा झटका! ‘हा’ स्टार खेळाडू घेणार क्रिकेटमधून ब्रेक, धक्कादायक कारण आलं समोर

Spread the love
Exit mobile version