
वाढते वजन ही अनेक लोकांसाठी मोठी समस्या असते. यामुळे त्यांना प्रचंड त्रास देखील सहन करावा लागतो. वजन न पेलल्याने पाय सुजणे, चालताना दम लागणे यांसारखे अनेक त्रास लठ्ठ लोकांना होतो. त्यातल्या त्यात आजूबाजूच्या लोकांच्या नजरांचा मानसिक त्रास तर वेगळाच! याच शारीरिक आणि मानसिक त्रासापासून वाचण्यासाठी एका महिलेने वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया ( surgery for weight loss) केली. यासाठी तिने तब्बल ३ लाख रुपये खर्च केले.
Jio Plan | डेली ३ GB डेटा आणि डेटा ऍड ऑन चे मोफत व्हाऊचर! जिओचा हा जबरदस्त प्लॅन एकदा ट्राय कराच…
लंडन ( Landon) मधील तिसजाना वुडवर्ड या महिलेने आपले वाढते वजन कमी करण्यासाठी गॅस्ट्रिक स्लिव्ह शस्त्रक्रिया केली. यामुळे तिचे वजन ५० किलोंपेक्षा कमी झाले. याआधी या महिलेचे वजन १३९ किलो इतके होते. आता मात्र ही महिला एकदम सडपातळ झाली आहे. मात्र एवढे पैसे खर्च करून सुद्धा शस्त्रक्रिया केल्यानंतर या महिलेला नवीनच त्रास सुरू झाला आहे.
“माझ्या वडिलांच्या वयाच्या माणसाने मला…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
तिसजाना वुडवर्ड हिला शस्त्रक्रियेनंतर अचानकच जास्त खाण्याचा आजार झाला आहे. कितीही खाल्ले तरी तिचे पोट भरत नाही. या महिलेला आता Binge Eating disorder ने ग्रासले आहे. वास्तविक पाहता अशी शस्त्रक्रिया केल्यानंतर लोकांना कमी भूक लागते. मात्र तिसजानाच्या बाबतीत अगदी उलट परिणाम दिसत आहे. मात्र असे असले तरी तिला शस्त्रक्रिया केल्याचा कोणताही पश्चाताप होत नाही. कारण वाढत्या वजनामुळे तिला भविष्यात अनेक धोके पत्करावे लागले असते.