मुंबई : सुप्रसिद्ध पॉप सिंगर आणि रॅपर हनी सिंग (hunny Singh) आणि त्याची पत्नी शालिनी तलवार (Shalini talvar) यांच्या घटस्फोटाबाबत चर्चा चालू होती. दरम्यान आता या दोघांचा कायदेशिररित्या घटस्फोट (Divorce) झाला आहे. हा घटस्फोट दिल्लीतील जिल्हा न्यायालयाच्या कौटुंबीक न्यायालयाने मंजूर केला आहे. हनी सिंग आणि शालिनी या दोघांचे 11 वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पती हनी सिंगविरोधात शालिनी तलवारने मारहाण आणि हल्ला घरगुती हिंसाचाराचा गुन्हा (A crime of violence) दाखल केला होता.
Anushka Sharma: अफगाणिस्तानविरुद्ध विराटची शतकी खेळी, पत्नी अनुष्काने केली भावूक पोस्ट; म्हणाली…
तसेच शालिनीने हनी सिंगवर इतर महिलांसोबत शारीरिक संबंधांसह अनेक गंभीर आरोप केले होते. याच आरोपांच्या आधारे शालिनीने हनी सिंगविरोधातघटस्फोट मागितला होता, त्यावर कोर्टात सुनावणी झाली असून त्या दोघांचा घटस्फोट झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शालिनीने हनी सिंगकडून घटस्फोटाच्या बदल्यात सुमारे १० कोटी रुपयांची पोटगी मागितली होती, परंतु तिला पोटगी म्हणून १ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
Queen Elizabeth: राणी एलिझाबेथ यांच्या जवळ अजूनही होती महात्मा गांधींनी दिलेली ‘ही’ भेटवस्तू
शालिनीचे हनी सिंगवरील आरोप
पत्नी शालिनी तलवार आरोप करत म्हणाली की, एक दिवस शालिनी तिच्या रूममध्ये कपडे बदलत होती तेव्हा तिचे सासरे सरबजीत सिंग दारूच्या नशेत खोलीत शिरले होते. आणि सासऱ्यांनी चुकीच्या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तसेच लग्नानंतर पती हनी सिंग तिला रोज मारहाण आणि शिवीगाळ करायचा. एवढंच नाही तर लग्नानंतरही हनी सिंगचे अनेक महिलांशी अवैध संबंध असल्याचा आरोप केला होता.
Ajit Pawar: “बारामतीत माझे काम बोलते”, अजित पवारांचा विरोधकांच्या बारामती दौऱ्यावरून घणाघात
हनी सिंग आणि शालिनीची प्रेम कहाणी
शाळेत शिकत असताना हनी सिंग आणि शालिनी यांची भेट झाली होती. पुढे दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. प्रेमातून त्यांच्या नात्याच लग्नात रूपांतर झाले. या दोघांनी 23 जानेवारी 2011 रोजी पंजाबी रितीरिवाजानुसार गुरुद्वारामध्ये लग्न केले होते. मात्र हनी सिंगने जवळपास 4 वर्षे आपल्या लग्नाबद्दलची माहिती लपवून ठेवली होती.