आजकाल रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. भिवंडी ( Bhiwandi) येथे नुकतेच दोन वेगवेगळ्या ठिकाणी भयानक अपघात घडले आहेत. यामध्ये बाप आणि लेकासह चार जणांचा अपघात होऊन तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास देखील सुरू केला आहे.
अभिनेत्री राणी मुखर्जी रोज घालते नवऱ्याला शिव्या; कारण ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क
यामधील पहिल्या घटनेत भिवंडीमधील पोगाव येथे पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यु झाला आहे. तसेच एक जण गंभीर जखमी झाला असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. त्यावर ठाण्यामधील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सूरु आहेत. कार चालवायला शिकत असताना हा अपघात झाला असून कार चालवणारा चुकीच्या पद्धतीने कार चालवत होता. यामुळे कार चालवणाऱ्यावर भिवंडी पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे.
या चार पाच पोरींना खोऱ्याने पैसा मिळतोय, जेष्ठ तमाशा कलावंताची गौतमी पाटीलवार जोरदार टीका
दुसरी घटना अंबाडी शिरसाड ( Ambadi Shirsad) या मार्गावर झाली असून यामध्ये कार व मोटार सायकलची धडक झाली आहे. या धडकेत वडिलांसह तीन वर्षांच्या बाळाचा मृत्यु झाला आहे. तसेच आणखी दोन लोक गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव येणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.
सर्वात मोठी बातमी! राज्यात अवकाळी-गारपिटीचा तडाखा, नद्या दुथडी भरून वाहिल्या
या अपघातामधील जखमी लोकांना अंबाडी येथील साईदत्त रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच अपघातातील कार चालक सुरज रघुनाथ शिंदे हा फरार झाला आहे. गणेशपुरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस कार चालकाचा तपास घेत आहेत.
‘नॉट रिचेबल’ असल्याच्या बातम्यांवर अजित पवार यांनी दिल स्पष्टीकरण; म्हणाले…