Mahad News । मुलगा झाल्याचा आनंद आला अंगलट! मित्रांसोबत पोहायला गेला अन् झालं असं काही की…

Mahad News

Mahad News । महाड : माणूस आनंदाच्या भरात काहीही करतो. याबाबतचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल होत असतात. याला नेटकरीही चांगला प्रतिसाद देतात. अनेकदा आनंद जीवावर बेततो. यात काहींना आपले प्राण गमवावे लागतात. यामुळे संबंधित व्यक्तींचे संसार उध्वस्त होतात. सध्या असेच एक प्रकरण घडले आहे. मुलगा झाल्याचा आनंद एका व्यक्तीच्या अंगलट आला आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Politics । ठाकरे गटाला मोठं खिंडार! चार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिला सामूहिक राजीनामा

महाड (Mahad) तालुक्यातील भोराव येथील नदीपात्रात ही धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी संध्याकाळी लोहारे देऊळकोंड येथील रहिवासी असणारे 35 वर्षीय मंगेश देवळे यांना मुलगा झाला. या आनंदात त्यांनी आपल्या मित्रांना महाडमधील काळ नदीवर (Mahad river) पार्टी दिली, ते पार्टी सुरू असताना सायंकाळी पाचच्या दरम्यान ते नदीमध्ये पोहावयाला उतरले.

Rajesh Tope । कारवर हल्ला झाल्यानंतर राजेश टोपे यांनी दिली पहिली प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्या कारचे.. .”

परंतु त्यांना अतिउत्साह नडला. अतिउत्साहात त्यांनी नदी पात्रात उडी घेतली पण जोरात नदी पार करण्याच्या नादात पोहताना त्यांना दम लागला. ही बाब सुरुवातीला त्यांच्या मित्रांच्या लक्षात आली नाही. त्यानंतर त्यांच्या मित्रांना ही बाब समजली, पण तोपर्यंत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे सर्वांना एकच धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Sujay Vikhe Patil । “रात्री कोण कुणाच्या घरी जातं, याचे व्हिडीओ माझ्याकडे…”; सुजय विखे पाटील यांचं वक्तव्य चर्चेत

Spread the love