टोमॅटोसाठी काय पण! भाजी विक्रेत्याने टोमॅटोच्या सुरक्षेसाठी ठेवले दोन बाऊन्सर, पहा व्हायरल व्हिडीओ

Tomato

एकेकाळी टोमॅटोला भाव (Tomato Price) मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळी आली होती. परंतु आता कवडीमोल भावात विकल्या जाणाऱ्या टोमॅटोने शंभरी (Tomato Price Hike) पार केली आहे. शेतकऱ्यांना महागाईच्या काळात काहीसा दिलासा मिळत आहे. परंतु याचा परिणाम सर्वसामान्य लोकांच्या खिशावर झाला असून त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. सध्या प्रत्येक घरात त्याचीच चर्चा सुरु आहे. (Latest Marathi News)

भीषण अपघात! पुण्यातील नवले पुलाजवळ कंटेनर उलटला

हॉटेलमधूनही टोमॅटो गायब झाला आहे. अशातच आता टोमॅटोच्या या स्टोरीत आणखी एका वेगळ्या घटनेची भर पडली असून त्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या सोशल मीडियावर (Social media) वाराणसीमधील (Varanasi) व्हिडीओ व्हायरल (Viral video) होत आहे. हा व्हिडीओ समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्याकडूनही शेअर करण्यात आला आहे.

दोन उपमुख्यमंत्र्यानंतर आता दोन उपसरपंच? पठ्ठयाने केली एकनाथ शिंदेंकडे अजब मागणी

वाराणसीमधील लंका भागातील अजय फौजी (Ajay Fauji) या विक्रेत्याने टोमॅटोच्या पहाऱ्यासाठी चक्क दोन बाऊन्सर (Bouncer for Tomato) ठेवले आहेत. यावर त्याने प्रतिक्रियाही दिली आहे. सध्याचे टोमॅटोचे वाढलेले दर आणि ग्राहक खरेदी करताना भांडण करतात. त्यासाठी बाऊन्सर तैनात केल्याचे त्याने सांगितले आहे. अखिलेश यादव यांनी अजय फौजी यांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत “भाजपने टोमॅटोला ‘Z+’ सुरक्षा द्यावी”, असा टोला लगावला आहे.

IND vs WI । एक जागा, खेळाडू दोन; सिलेक्टर्स कोणाची निवड करणार? वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी भारतीय संघ अडचणीत

Spread the love