मुंबई : आपल्याला माहीत आहे भारतातील लोकांचा देवी देवतांवर खूप श्रद्धा आहे. तसेच यातीलच अनेक लोक नाग देवतेला मानतात. तसेच नाग देवताची (serpent deity) पूजा करतात. दरम्यान बिहारमधील (bihar) समस्तीपूर जिल्ह्यातील सिंघियामध्ये नागपंचमीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने सर्पमेळ्यांचे (snake fairs) आयोजन केले जाते. आत्ताच नाही तर गेल्या तीनशे वर्षांपासून या सर्पमेळ्यांचे आयोजन केले जाते. नागपंचमीच्या दिवशी ही सापांची यात्रा असते.
एसटी महामंडळ रीलस्टार लेडी कंडक्टरसमोर झुकले, अखेर मंगल गिरी यांचे निलंबन मागे
दरम्यान सापांच्या या जत्रेत जाण्यापूर्वी लोक माँ भगवतीच्या मंदिरात पूजा करतात. ढोल वाजवत सगळे गंडक नदीवर पोहोचतात. महत्वाची बाब म्हणजे तेथील अनेक लोकांचा असा विश्वास आहे की अशा प्रकारे पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. या सापांच्या जत्रेत तेथील भाविकांचा उत्साह खरोखरच पाहण्यासारखा आहे. या जत्रेत अनेक भाविक येतात आणि नदीत स्नान करून साप शोधतात.
Shiv Thackeray: “माझ्या १६९ गर्लफ्रेंड होत्या”, शिव ठाकरेने केला मोठा खुलासा
नदीतून साप बाहेर काढताच सर्व भाविक आनंदाने टाळ्या वाजवू लागतात. सापांना केवळ हाताने धरूनच नाही तर तोंडानेही बाहेर काढले जाते. नदीतून काढलेले सापांच्या सुरक्षितेची काळजी घेतली जाते. अशा परिस्थितीत या जत्रेशी अनेकांची श्रद्धाही जोडलेली असते. अनेकदा या जत्रेत भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. समस्तीपूर सारख्या सर्पमेळ्यांचे आयोजन संपूर्ण भारतात फक्त इथेच होते असे लोक मानतात.
चक्क घराची भिंत पाडताना सापडली तब्बल 160 हून अधिक चांदीची नाणी, पुढे झालं अस की…