Ajit Pawar । भाषण सुरु असताना अजितदादा असे काय म्हणाले की, अमित शहांना हसू आवरेना

What did Ajit Dada say during the speech that Amit Shah couldn't stop laughing

Ajit Pawar । पिंपरी चिंचवड : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे लोकमान्य टिळक पुरस्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे शहरात येऊन गेले. त्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज पुणे दौरा आयोजित करत शहरातील वेगवेगळ्या कार्यक्रमांचे उद्घाटन केले. दरम्यान, माही काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांचे पुणे शहरावर लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच आता दोन बड्या नेत्यांच्या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. (Latest Marathi News)

Mumbai Bomb Blast । मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर? लोकल ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोटाची धमकी

बंडांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शहा आज प्रथम एकाच मंचावर आले होते. यावेळी पवारांनी शहांचे तोंडभरून कौतुक केले. बोलताना ते म्हणाले की, “अमित भाई हे गुजरातचे असले तरी त्याचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. इतकंच नाही तर ते या राज्याचे जावई आहेत आणि प्रत्येक जावयाचे सासुरवाडीवर विशेष प्रेम हे असतेच,” असे म्हणताच अमित शाह यांना हसू आवरता आले नाही.

शिक्षकांना लागणार शिस्त? आता वर्गात नेता येणार नाही फोन

पुढे ते म्हणले की, “काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्य एक होती. आमचा केंद्रात सहकार विभाग निर्माण व्हावा यासाठी बावीस वर्ष प्रयत्न सुरु आहे. परंतु, हे डेरिंग केवळ अमित भाईंनी दाखवलं. त्यामुळे आज सहकार क्षेत्रात मोठी क्रांती होत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे.

Tomato Price । टोमॅटोच्या किमती पुन्हा कोसळणार? येत्या काळात कसे असेल बाजाराचं चित्र, जाणून घ्या

अमित शाह देशाचे पहिले सहकारमंत्री झाले आहेत. देशातिल सर्वच कारखाने आयकरमुळे अडचणीत आले होते, परंतु आता नरेंद्र मोदी यांच्या एका निर्णयामुळे यावर तोडगा मिळालं. अमित शहांनी लोकसभेत बील आणून सर्वच साखर कारखान्यांचा टॅक्स माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Weather forecast । नागरिकांनो.. काम असेल तरच बाहेर पडा, ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार मुसळधार

हे ही पहा

Spread the love