मुंबई : मागच्या काही दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘ब्रह्मास्त्र’ प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट खुप आवडला. ‘ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर रणबीर कपूर आता नव्या चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अॅनिमल’(Animal Movie) या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबत दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) दिसणार आहे.
विद्युत तारेच्या करंटने एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. रणबीर आणि रश्मिका यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्यादेखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. दरम्यान नुकतच एका मुलाखतीत रश्मिकाने तिचा रणबीरबरोबर शूटिंग करण्याचा अनुभव शेअर केला. तिने रणबीरच्या स्वभावाच्या काही गोष्टी उलगडताना तिला रडू आले होते.
माणुसकी दाखवणे पडले महागात, अज्ञात व्यक्तीला दिली लिफ्ट आण तो निघाला चोर
रश्मिकाने सांगितले की, “सेटवरचा नाश्ता करून मला कंटाळा आला होता. कारण सेटवरचे जेवण फारसे चविष्ट नसायचे. मी एकदा गप्पा मारताना रणबीरला सांगितले की, सेटवरचे जेवण खूप कंटाळवाणे आहे. मग काय दुसऱ्याच दिवशी रणबीरने माझ्यासाठी त्याच्या घरातील स्वयंपाकीकडून तोच नाश्ता बनवला जो मी काल खाल्ला होता. रणबीरच्या कुकने बनवलेला नाश्ता खूप चविष्ट होता.” रणबीरची ही काळजी पाहून रश्मिका रडू लागली.
कांदा उत्पादकांची दिवाळी, खरीप कांदा मुहूर्ताला मिळाला ‘इतका’ उच्चांकी भाव
पुढे रश्मिका म्हणाली, “जेव्हा रणबीरने मला चविष्ट नाश्ता खाल्ल्यावर रडताना पाहिलं तेव्हा तो म्हणाला की, “रश्मिका, रोज हे बेचव पदार्थ तू का खातेस?” यावर मी रणबीरला सांगितले की, “तू भाग्यवान आहेस कारण तुझ्याकडे चांगला स्वयंपाकी आहे, पण मी तुझ्याइतकी भाग्यवान नाही. कारण मी एक सामान्य माणूस आहे. ”इतकेच नाही तिचा प्रत्येक सीन झाल्यावर रश्मिका रणबीरला तिचा सीन कसा झाला हे विचारायची, त्यावर रणबीर तिला त्याचे मत सांगायचा. रणबीर खूप गोड आहे असेही रश्मिकाने मुलाखतीदरम्यान सांगितले.