Site icon e लोकहित | Marathi News

काय सांगता! एका मराठमोळ्या चाहत्याने चक्क 57 भाषांमध्ये कारवर छापलं रतन टाटांंच नाव

What do you say! A Maratha fan printed Ratan Tata's name on the car in 57 languages

आपण नुसत टाटा हे नाव जरी उच्चारले तरी आपल्यासमोर देवमाणूस म्हणून रतन टाटा दिसतात. याच कारण म्हणजे
रतन टाटा यांनी भारतासाठी केलेलं औद्यागिक आणि सामजिक कार्य. विशेष म्हणजे रतन टाटा (Ratan Tata) यांचे कार्य हे खरतर भारत देशासाठी खूपच उल्लेखनीय आहे.

तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे पुल कोसळला; पाहा VIDEO

दरम्यान याच उल्लेखनीय कार्यातून प्रेरित होऊन अहमदनगरचे रहिवासी रवी पाटोळे रतन टाटांचे मोठे चाहते झाले आहेत. इतकंच नाही तर रतन टाटा यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी रवी पाटोळी यांनी जगातील तब्बल 57 भाषांमध्ये टाटांचं नाव आपल्या चारचाकी गाडीवर लिहीलं आहे. विशेष म्हणजे रतन टाटा यांचा फोटो आणि 57 भाषांमधली ही नावं रवी पाटोळी आपल्या चारचाकी गाडीवर अभिमानाने मिरवतात.

शेतात पिकांवर फवारणी करताना सावधान! 55 वर्षीय शेतकरी महिलेचा औषध फवारणी करताना झाला मृत्यू

विशेष म्हणजे रवी पाटोळे हे टाटा यांचे खूप मोठे चाहते आहेत. फक्त चाहते म्हणून चालणार नाही तर ते सकाळी उठल्यावर देखील चहा टाटाचाच पितात. एवढच नाही तर घरात वापरले जाणारे मीठ टाटाचे, डिश टीव्ही सुद्धा टाटाचीच.

शेतकऱ्यांसाठी आनंददायक! ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला 3500 रुपये दर

दरम्यान महत्वाची बाब म्हणजे त्यांची गाडीसुद्धा टाटाचीच आहे. तसेच रवी पाटोळे यांनी लग्नाच्या वेळी त्यांच्या बायकोला फोन सुद्धा टाटा कंपनीचा घेऊन दिला होता. दरम्यान या अवलियाने आपल्या टाटा गाडीवर टाटा The Pride Of India हे वाक्य जगातील 57 भाषेत त्याचे स्टिकर बनवून गाडीला चिटकवले आहेत.

ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल 29 वर्षीय विद्यार्थ्याला अटक

Spread the love
Exit mobile version