पुणे: पुणे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असत. आता पुणेकरांसाठी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. पुण्यात जर घरात मांजर (Cat) पाळायाचे असेल तर आता त्यासाठी पुणे महापालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे.
चक्क बकरीच्या पिल्लाचा केला वाढदिवस साजरा ! इतकेच नाही तर, डीजे लावून फोटोसुद्धा काढले…
आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पुण्यात जर घरात मांजर (Cat) पाळायाचे असेल तर आता त्यासाठी पुणे महापालिकेची परवाना घ्यावा लागणार आहे. पुढच्या आठ दिवसांमध्ये परवान्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांना घरी ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करून त्याची परवानगी घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
IND vs ENG: रोहित शर्मा ढसाढसा रडत होता ‘या’ व्यक्तीने काढली समजूत, यालाच तर म्हणतात टीम इंडिया
मांजराची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. त्यासाठी वर्षाला 50 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा रहिवासी पुरावा, लसीकरण प्रमाणपत्र आणि मांजराचा फोटो ही कागदपत्रे लागणार आहेत.
दिव्यांगांसाठी होणार स्वतंत्र मंत्रालय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय
बऱ्याच वेळा घरात जवळपास दहा ते पंधरा मांजरे पाळले जातात. यामुळे शेजाऱ्यांमध्ये भांडणे देखील मोठ्या प्रमाणात होतात. काही भांडणे तर पोलीस स्टेशन पर्यंत गेलेली आहेत.
सावधान! लॉटरीचे आमिष दाखवून होतेय फसवणूक; महिलेचे 50 हजारांचे नुकसान