DGCA Rule । काय सांगता! भारतीय वैमानिकांना परफ्यूम वापरता येणार नाही? जाणून घ्या नेमकं कारण

What do you say! Indian pilots can't wear perfume? Know the real reason

DGCA Rule । अलीकडच्या काळात परफ्यूम (Perfume) आणि डिओडोरंट (Deodorant) वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेक कंपन्या मागणी आणि गरजेनुसार परफ्यूम तसेच डिओडोरंट बाजारात आणत असतात. मागणी जास्त असल्याने त्यांच्या किमती जास्त असतात. तरीही अनेकजण ते खरेदी करतात. त्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते आणि शरीराचा कसलाच दुर्गंध येत नाही. (Latest Marathi News)

Buldhana News । भीषण अपघात! रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांवर काळाचा घाला, ४ जणांचा मृत्यू तर ६ गंभीर जखमी

विमानात परफ्यूम आणि डिओडोरंट नेता येत नाही. कारण त्यात अल्कोहोलयुक्त (Alcohol) पदार्थ आढळतात. अशातच आता डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (Directorate General of Civil Aviation) वैमानिकांना परफ्यूम वापरण्यावर बंदी घालू शकते. याच पार्श्वभूमीवर विमान वाहतूक नियामकाने सुरक्षा नियमांसंदर्भात, विमान नियम, 1937 च्या तरतुदींनुसार जारी करण्यात आलेल्या Civil Aviation Regulations मध्ये सुधारणा करण्यासाठी सुचना मागवण्यात आल्या आहेत.

Jitendra Awhad । ‘घोडा लावला, हे शब्द…. ताई जरा जपून’; जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टवरून चर्चा

विमान नियमानुसार, कोणत्याही वैमानिकाने किंवा सदस्याने कोणतेही औषध तसेच फॉर्म्युलेशनचे सेवन करू नये, माउथवॉश/टूथ जेल/परफ्यूम किंवा अशा कोणत्याही उत्पादनाचा वापर करू नये. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही सदस्याने फ्लाईंग असाइनमेंट घेण्यापूर्वी कंपनीच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. याबाबत प्रत्येक विमान कंपन्यांच्या संकेतस्थळांवर माहिती दिली आहे.

Laser Light । गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचणे आले अंगलट, लेझर लाईटमुळे 6 जणांचा डोळा जाण्याची शक्यता

Spread the love