पुणे: ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आणि अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक सहयोग आणि शेतकरी मार्गदर्शन यांसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या कराराद्वारे कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष तसेच डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे मार्गदर्शन करण्यासाठी ॲमेझॉन प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतील. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शनाद्वारे अगदी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न आहे.
Lumpy: लम्पी आजाराने घातले थैमान! पाहा महाराष्ट्रातील सद्यस्थिती
अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी अॅमेझॉनचे तंत्रज्ञान व कृषी विज्ञान केंद्राच्या सामंजस्य कराराने महाराष्ट्रातील प्रगत शेतीची गाथा सर्व देशांत पोहचेल. त्याचबरोबर, हवामानबदलाने येणाऱ्या काळातील शेती अजून बिकट होत जाईल आणि त्यासाठी आपले शेतकरी तयार राहावेत. यासाठी या दोन्हीही संस्था प्रयत्न करतील.
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! भाजीपाल्यांचे दर भिडले गगनाला; वाचा सविस्तर
यावेळी शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी म्हणाले की, प्रगत तंत्रज्ञानाद्वारे उत्पादन कसे घ्यावे, विषमुक्त शेती कशी करावी यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीमार्फत तयार केलेली नियमावली भारतातील सर्वच राज्यांमध्ये पोहचविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. ॲमेझॉन किसानचे सिद्धार्थ टाटा म्हणाले की, भारतात शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत असल्याने शेतीमधील उत्पादकता देखील १५ ते २० टक्के वाढली आहे. यावेळी अॅमेझॉनच्या कृषी नियामक विभागाचे डॉ. शशीन शोभणे, प्रदीप भापकर व स्वाती नायक तसेच कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख धीरज शिंदे, संतोष गोडसे आदी उपस्थित होते.