Traffic Rule । पुणे : देशात दररोज अपघात (Accident) घडत असतात. या अपघातात काहींना आपला जीव गमवावा लागतो. तर काहींना कायमचे अपंगत्व येते. त्यामुळे अनेक संसार उध्वस्त होतात. याच पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियम (Traffic rules) कडक करण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दंडाच्या शुल्कात (Traffic rules fine) वाढ केली आहे. परंतु तरीही अनेकजण वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. (Latest Marathi News)
Gadar 2। धक्कादायक, पाकिस्तानी खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यावर हल्ला
पुणे शहरात रिक्षाचालकाने हेल्मेट घातले नाही म्हणून त्याला दंड (Rickshaw driver fine) ठोठावला आहे. पुण्यातील शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्ह चौकात टिपलेल्या दृश्याच्या आधारे ही ऑनलाइन दंडाची पावती रिक्षामालक, भीम छावा संघटनेचे अध्यक्ष श्याम गायकवाड यांना मिळाली. लता गव्हाणे या महिला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांकडून हा दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Chandrayaan 3। चंद्राजवळ पोहोचूनही ‘चांद्रयान 3’ला 23 तारखेपूर्वी लँडिंग शक्य नाही, कारण…
त्याबाबत श्याम गायकवाड यांनी तातडीने वाहतूक विभागाशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी नजर चुकीने ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आले. समजा ही चूक एखाद्या सामान्य नागरिकांकडून चूक झाली असती तर वाहतूक विभागाने त्याला माफ केले असते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बंपर ऑफर! स्वस्तात खरेदी करा iPhone 12, ‘या’ ठिकाणी मिळत आहे संधी