
अयोध्येत (Ayodhya) 23 ऑक्टोबर रोजी दीपोत्सवानिमित्त सरयू पायडीचे 37 घाटात तब्बल 15 लाख 76 हजार दिवे (lights) प्रज्वलित करण्याचा विश्वविक्रम करण्यात आला. परंतु येवढे सगळे दिवे विझताक्षणी घाटाचे (ghat) एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. ते दृश्य म्हणजे जवळपास राहणारे गरीब वर्गातील लोक घाटावर लावलेल्या 15 लाख 76 हजार दिव्यांमधील तेल (Oil) भांड्यात भरताना दिसले. महत्वाची बाब म्हणजे या दिव्यांमध्ये तब्बल 60 हजार लिटर मोहरीचे तेल भरण्यात आले होते. खरतर हे मोहरीचे तेल (Mustard oil) 200 रुपये लिटरने विकत घ्यावे लागते. परंतु ते येथे मोफत मिळत असल्याचे तेथील लोकांचे म्हणणे आहे.
बिर्याणीतील मसाल्यामुळे होतय पौरुषत्व कमी, TMC च्या ‘या’ नेत्याचा आगळावेगळा दावा
त्यामुळे तेथील लोक दिव्यातील तेल घेऊन घरी जाऊन दिवाळी साजरी करणार होते. अयोध्येच्या राम मंदिरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यासह प्रमुख पाहुणे निघाल्यानंतर लगेचच तेथील लोक दिव्यांनमधील तेल गोळा करण्यासाठी घाटावर पोहोचले. तेल गोळा करण्यासाठी चक्क लहान मुले, महिला, युवक, वृद्ध, सर्वजण होते. विशेष म्हणजे हे लोक तासनतास दिव्यांतून तेल गोळा करत होते. दरम्यान ते तेल गोळा करून बाटल्या, भांड्यांमध्ये भरत होते.
उसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्या, जनहित संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांची मागणी
दरम्यान अयोध्येतील बहराइचमधील एका गावात राहणारी पूजा आपल्या कुटुंबासह 16 क्रमांकाच्या घाटावर आली होती. ती या घाटावर लावलेल्या दिव्यांमधील तेल बाटलीत ओतत होती. महत्वाची बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी ती कुटुंबासह अयोध्येत चक्क तेल गोळा करण्यासाठी आली होती. गेल्यावर्षी दिवाळीत तिने दिव्यांमधिल 10 लिटर तेल जमा केले होते. हे तेल तिला सहा महिने पुरले. पुजाच नाही तर श्रावस्ती येथे राहणारी दीपा देखील गावातील लोकांसह 14 क्रमांकाच्या घाटावर तेलाचा डबा भरत होती.
मोठी बातमी! अंध मुलांच्या शाळेला आग लागून ११ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू
यावेळी दीपा म्हणाली की, तिच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले असून आई देखील आजारी आहे. मी घरातील मोठी मुलगी असल्याने माझ्यावर जबाबदारी आहे. मी गावातील लोकांसोबत तेल गोळा करायला आलो आहे. 200 रुपयांनी तेल विकत घ्यावे लागते ते परवडत नाही. त्यामुळे ते तेल गोळा करण्यासाठी तिथे आले होते. तसेच तेल गोळा करायला आलेल्या काही कामगारांनी सांगितले की, सणासुदीच्या काळात एक-एक रुपयांसाठी धावपळ करावी लागते. पण आता आमच्याकडे पैसेही नाही. तसेच यावेळी एका रघूवीर नावाच्या नागरिकाने सांगितले की, “आम्ही तेल आधी गरम करुन घेतो. मग ते तेल गाळून स्वच्छ करुन घेतो. त्यानंतरच ते तेल आम्ही स्वयंपाकासाठी वापरतो.”
WhatsApp: “…क्या गुंडा बनेगा रे तु?” व्हॉट्सअॅप डाऊन होताच ट्विटरवर मिम्सचा पडला पाऊस