‘द केरळ स्टोरी’ ( The Kerla Story) हा चित्रपट मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. अगदी या चित्रपटाचा ट्रेलर ( Trailor) रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. तरीसुद्धा या चित्रपटावर तुफान चर्चा रंगली आहे. देशात काही ठिकाणी हा चित्रपट मोफत दाखवला जातोय तर काही ठिकाणी चित्रपटाचे प्रदर्शन रोखले आहे.
मोठी बातमी! गौतमी पाटीलने घेतली खासदार उदयनराजे यांची भेट; चर्चांना उधाण
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banarji) यांनी या चित्रपटावर बंदी आणली. मात्र या वादाचा कसलाच परिणाम या चित्रपटाच्या कमाईवर झालेला नाही. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तगडी कमाई करत आहे. ( Grand box office collection of the kerala story ) ‘द केरला स्टोरी’ प्रदर्शित होऊन फक्त दहा दिवस झाले आहेत. आता या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल पहिले तर या चित्रपटाने अवघ्या १० दिवसात १२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादावर अदा शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.
महिलेला बेशुद्ध करून बेडवर नेले नको ते केलं, अश्लील फोटोही काढले अन्..
द केरळ स्टोरी चित्रपटाला एवढा प्रतिसाद मिळतोय यावर तुला काय वाटतंय? असा प्रश्न विचारतात अभिनेत्री अदा शर्मा म्हणाली, “चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून मी खूप आनंदी आहे. मी चित्रपटात काम करत असताना शेवटचा चित्रपट म्हणूनच काम करत असते कारण परत संधी मिळेल का नाही हे माहित नसत. एवढंच नाही तर चांगली संधी मिळण्यासाठी ‘ओम शांती ओम’ या चित्रपटामधील शाहरुख खानसारखा पुनर्जन्म घ्यावा लागेल का, असा विचार पूर्वी माझ्या मनात यायचा असं अभिनेत्री अदा शर्मा म्हणाली.
मोठी बातमी! पुण्यात महाविद्यालयीन तरुणाची रॅगिंगला कंटाळून आत्महत्या