राज्यात मागील काही दिवसांपासून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. मात्र याबाबत सरकारची बैठक झाली असली तरी, ठोस असा निर्णय न झाल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कालपासून बेमुदत संपावर आहेत. ( Governmet employee strike) जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील 19 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. यामध्ये राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासोबत महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदांतील कर्मचारी सुद्धा संपावर आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल जुनी पेन्शन योजना म्हणजे नक्की काय? चला तर मग जाणून घेऊया याबद्दल माहिती.
मोठी बातमी! कोयता गँगच्या म्होरक्याला पोलिसांनी केली अटक
जर एकदा कर्मचारी सरकारी संस्थेतून सेवानिवृत्त झाला तर त्या कर्मचाऱ्याला उर्वरित आयुष्य जगण्यासाठी पेन्शन दिली जाते. 2004 पर्यंत जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याला पगाराच्या निम्मी रक्कम दर महिन्याला दिली जात असे. त्याचबरोबर यामध्ये जर पेन्शन भेटणाऱ्या कर्मचाऱ्याचे निधन झाले तर ती रक्कम कर्मचाऱ्यांच्या पत्नीला मिळायची. मात्र, कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या या योजनेतील रकमेसाठी कोणताच वेगळा निधी उभारला जात नाही, त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सरकारच्या तिजोरीतून पेन्शन द्यावी लागत असे. त्यामुळे पेन्शनच्या रकमेचा संपूर्ण भार सरकारी तिजोरीवर पडत होता. यामुळे सरकारने जुन्या पेन्शन योजनेऐवजी नवीन पेन्शन योजना सुरू केली.
सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई कडून धमकी; “त्या प्रकरणी माफी मागावी अन्यथा…”
काय आहे नवी पेन्शन योजना?
सरकारने 2003 साली जुनी पेन्शन योजना रद्द केली आणि त्यांनतर नवीन पेन्शन योजना चालू केली. आता या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या पगारातून फक्त १० टक्के रक्कम दिली जाते. मात्र, जुन्या आणि नवीन पेन्शन योजनेच्या रकमेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांकडून नव्या योजनेला विरोध विरोध होत असून जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन केले जात आहे.
भारतातील सर्वात लहान कार लवकरच लाँच होणार! जाणून घ्या कारची किंमत आणि वैशिष्ट्ये