मुंबई : रविवारी सकाळी सातच्या सुमारास इडीच पथक संजय राऊतांच्या (Sanjay Raut) घरी पोहोचल. त्यांच्या घरातील कागदपत्र व दस्तावेज अधिकाऱ्यांनी तपासून पाहिले व साडेअकरा लाख रुपयांची रोकड जप्त केली. त्यांच्या घरी सापडलेल्या साडेअकरा लाखांचा हिशोब न देता येणे आणि चौकशीला सहकार्य न करणे या दोन आरोपांखाली त्यांना 1 ऑगस्ट 2022 रोजी पावणे एक वाजता संजय राऊतांना अधिकृतपणे ED कडून अटक करण्यात आली. भाजपाने राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोपच खंडन केलं. हे पत्राचाळ घोटाळा प्रकरण नेमकं काय? यावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra ) यांनी खुलासा केला आहे.
संजय राउत के घोटाले का पूरा सच…#PatraChawlScam pic.twitter.com/Hrp20pCuNa
— Sambit Patra (@sambitswaraj) August 2, 2022
संबित पात्रा यांनी त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून त्यांचा व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे, त्यांनी व्हिडीओमध्ये पत्राचाळ प्रकरणाबाबत खुलासे केले आहेत. सध्या त्यांचे ट्विट सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय बनले आहे.
नेमकं काय आहे पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरण?
मुंबईमधील गोरेगाव येथे पत्राचाळी मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाची जमीन आहे. या चाळीचा पुनर्निर्मान करण्यासाठी प्रवीण राऊत (Praveen Raut) यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन यांना दिला होता परंतु त्यांनी त्या जागेतील काही भाग इतर खाजगी बिल्डरांना हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.