
मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे एक आंतरजातीय विवाह (Intercast marriage)झाला होता. हिंदू समाजाच्या तरुणाने मुस्लीम तरुणीशी (Muslim girl) लग्न केलं होतं. दरम्यान हे लग्न केल्यानंतर तो मुलगा बेपत्ता झालेला आहे. परंतु मुलाच्या घरच्यांकडून तरुणीच्या कुटुंबीयानीच तरुणाचे अपहरण (Abduction)केल्याचा आरोप केला जात आहे. जेव्हापासून हा मुलगा बेपत्ता झाला आहे तेव्हापासून पोलीस (police) याचा शोध घेत आहेत. मात्र अजूनही तो सापडला नसल्याने तरुणाचे कुटुंबीय अधिकच चिंताग्रस्त झाले आहेत.
Kavya Yadav: अखेर प्रसिद्ध युट्यूबर काव्या यादव सापडली, पालकांनी मानले पोलिसांचे आभार
दरम्यान याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात आज श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला होता. तसेच या जनआक्रोश मोर्चात तरुणाचे कुटुंबीय, माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उइके यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान या मोर्चानंतर आमदार नितेश राणेंनी पत्रकारपरिषदेत बोलताना आक्रमक भूमिका मांडली.
राज्यातील शेतकरी राजासाठी आणखी एक योजना, वर्षाअखेरीस मिळणार ‘एवढी’ रक्कम
यावेळी नितेश राणे म्हणाले की, “संबंधित तरूणाने एक मुस्लीम मुलीशी लग्न केले. परंतु त्या मुलीच्या घरच्यांना हे आवडलं नसल्याने त्यांनी रागापोटी अपहरण केलं. दरम्यान आज तो मुलगा कोठे आहे, तो जिवंत आहे की नाही, त्याच नेमकी
नेमकं काय झालं याबाबत पोलीसही काही सांगत नाहीत आणि त्याच्या कुटुंबालाही काही माहीत नाही.
पुढे नितेश राणे म्हणाले की आमच्या या आक्रोश मोर्चात मुलाचे वडील आमच्याबरोबर होते. त्यांच्या डोळ्यात प्रत्येक पाच मिनिटांनी अश्रू येत होते.वारंवार ते मला एवढंच म्हणत होते की माझा मुलगा फक्त माझ्यापर्यंत आणून द्या. त्याचे इतर कुटुंबीय देखील आम्हाला भेटले. माझ्या मुलाची नेमकी चूक काय आहे?, त्याने एका मुस्लीम मुलीशी लग्न केलं ही त्याची चूक झाली का?”हे त्यांना विचारायचं आहे.
Trupti Desai: धक्कादायक! भाजप नेत्याच्या फार्महाऊसवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तृप्ती देसाई आक्रमक
“ आमच्या एका मुलाने मुस्लीम मुलीशी लग्न केलं तर त्याचं अपहरण झालं आणि त्याचा पत्ता लागत नाही. अशा असंख्य घटना तुमच्या अहमदनगरमध्ये आणि महाराष्ट्रात घडतात. जिथे आमच्या हिंदू मुलींना विकण्याचं, वैश्या व्यवसायास लावण्याचं, आणि त्यांचं भविष्य अंधारात टाकतात. मग तेव्हा हिंदू समाज म्हणून आम्ही नेमकं काय करायचं? आम्ही असंच वागायचं का? सगळं सहन करण्याचा ठेका हा फक्त हिंदू समाजानेच घेतला आहे का?” असा देखील सवाल यावेळी नितेश राणेंनी उपस्थित केला.