महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक आज पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आज चार वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections) पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. या बैठकीसाठी महाविकास आघाडी मधील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil) यांनी बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली.
Gautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे नियोजन करणे पडले महागात! पोलिसांनी केली कारवाई
कर्नाटकमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा मोठा पराभव झाला. महाविकास आघाडीच्या आजच्या या बैठकीत निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये भ्रष्टाचार, विविध तपास यंत्रणांचा गैरवापर आणि स्थानिक दृष्ट्या जनतेला त्या सरकारचा आलेल्या अनुभवांचा आढावा घेतला गेला. असे जयंत पाटील म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षाच्या निकालाची तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी आज महाविकास आघाडी म्हणून चर्चा केली. कडक उन्हाळा सुरू असल्याने महाविकास आघाडीच्या सभा प्रलंबित ठेवल्या आहेत. पावसाचे वातावरण पाहून सभा सुरु करण्यात येणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि आमच्या आघाडीतील अन्य नेत्यांसोबत चर्चा करून लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या जागांबाबत लवकरच निर्णय घेणार आहोत. अशी माहिती यावेळी जयंत पाटील यांनी दिली आहे.