स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत राणूबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच अश्विनी महांगडे (Ashwini Mahangde) होय. छत्रपती महाराजांच्या कन्येच्या भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या समोर आली. तिची ही भूमिका जबाबदारीने पार पाडून तिने प्रेक्षकांच्या मनात एक स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले.
पावसासंदर्भात मोठी बातमी! पुढील दोन-तीन दिवसात पडणार जोरदार पाऊस; वाचा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट्स
अश्विनी मुळची सातारा जिल्ह्यातील पसरणी या गावची आहे. रानुबाईंच्या भूमिके अगोदर अश्विनीने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केला आहे. झी मराठीवरील अस्मिता ही मालिका तिची विशेष ठरली. तर सध्या सुरू असलेली स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत देखील अश्विनी अनघाची भूमिका साकारत आहे.
अश्विनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यातील काही क्षण सोशल मीडियावर शेअर करत असते. अश्विनीने तिच्या चाहत्यांसाठी नुकतीच एक खुशखबर शेअर केली आहे. अश्विनीचे चाहते तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूपच उत्सुक असतात. यापूर्वी अश्विनी महाराष्ट्रशाही व्यतिरिक्त बॉईज या चित्रपटात झळकली होती.
पोस्ट करताना अश्विनी लिहिले की, आज अतिशय आनंदाची बातमी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. खूप मोठी जबाबदारी, मनावर दडपण आणि तितकाच आनंद होत आहे. माझी प्रमुख भूमिका असलेला ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ या चित्रपटाची आज घोषणा झाली. रसिक मायबाप प्रेक्षकहो या चित्रपटावर आपण प्रेम करावे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असे तिने म्हटले आहे.