Flight mode । तुमच्यापैकी जवळपास सर्वांकडे स्वतःचा स्मार्टफोन (Smartphone) असेलच. त्यात वेगवेगळ्या सेटिंग्स असतात. त्यातील एक सेटिंग म्हणजे फ्लाइट मोड. प्रत्येक फोनमध्ये फ्लाइट मोड (Flight mode use) नावाचा पर्याय असतो. अनेकांना फ्लाइट मोड म्हणजे काय? त्याच काम काय असते? तो कधी आणि कसा चालू करावा? जर तो चालू केला नाही तर काय होते? असे अनेक प्रश्न पडतात. (Latest Marathi News)
Bus Accident । ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट नदीत कोसळली
फ्लाईट मोड म्हणजे काय?
प्रामुख्याने याचा वापर विमानातून प्रवास करताना करण्यात येतो. Flight Mode ला Airplane Mode असे देखील म्हटले जाते. ज्यावेळी तुम्ही हा पर्याय अॅक्टीव्ह करता त्यावेळी रेडिओ-फ्रिक्वेंसी सिग्नल ट्रान्समिशन बंद करण्यात येते. जेणेकरून तुमचा सेल्युलर नेटवर्कशी संपर्क बंद होतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या फोनद्वारे कोणाला कॉल, मेसेज पाठवता येत नाही आणि इंटरनेचा वापर देखील करता येत नाही.
Sharad pawar । निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना मोठा धक्का बसणार; बडा नेता सोडणार पक्षाची साथ
कधी वापरावा फ्लाईट मोड?
विमान प्रवासादरम्यान फोन फ्लाईट मोडवर ठेवायला सांगतात. विमान टेक ऑफ करत असते तेव्हा मोबाईल आणि टॉवरमध्ये अंतर वाढले जाते त्यामुळे मोबाईलचे नेटवर्क कमी व्हायला सुरुवात होते, असे झाल्याने फोन टॉवरला कनेक्ट होण्यासाठी जास्तीचे संदेश पाठवत असतो. विमानाच्या नेव्हिगेशन आणि ट्रान्समिशनमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे विमानाने प्रवास करताना फोन एअरप्लेन मोडवर ठेवायला सांगतात.
असा चालू करा फ्लाईट मोड
- स्मार्टफोनमधील सेटिंग्ज उघडा.
- त्यानंतर इंटरनेट आणि नेटवर्क’ पर्यायावर क्लिक करा.
- अशाप्रकारे तुमच्या फोनमधील Airplane Mode अॅक्टीव्ह होतो.
फ्लाइट मोड कधी बंद करावा?
विमानातील क्रूने सूचना देताच तुमचा फोन फ्लाइट मोडवर टाका. प्रवास पूर्ण झाल्यानंतर विमानाचे दरवाजे उघडताच किंवा क्रूने पुन्हा सुचना देताच तुम्हाला फ्लाइट मोड बंद करता येईल.
Viral News । लग्नानंतर काही दिवसातच पतीला समजले पत्नीचे भयानक रूप!