
Maharashtra Politics । मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. अगोदर मराठा (Maratha Reservation) त्यानंतर ओबीसी (OBC Reservation) आणि धनगर समाज आरक्षणासाठी (Reservation) आक्रमक झाला आहे. अशातच शेतकरीही कांद्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. एकीकडे वेगवेगळ्या मुद्द्यावरून राज्याचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री वर्षावर रात्री तातडीने दाखल झाले. (Latest Marathi News)
Havaman Andaj । मोठी बातमी! राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सव्वा दहाच्या दरम्यान दाखल झाले. या बैठकीमध्ये मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती मिळते. अजित पवार वर्षा निवासस्थानी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले नसल्याने पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
Bus Accident । भीषण अपघात! बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू; अनेकजण गंभीर जखमी
दरम्यान, अजूनही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. या विस्ताराकडे आमदारांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. वारंवार बैठका होऊन मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नाही. अशातच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी अचानक रात्री दहा वाजेनंतर बैठक पार पडल्यानंतर चर्चाना उधाण आले आहे.
Viral Video | मोठी बातमी! क्रिकेटच्या मैदानात दोन संघांमध्ये तुफान हाणामारी; पाहा व्हिडीओ