मराठी (Marathi) टेलिव्हिजन क्षेत्रात अनेक कलाकार (Aartist) आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवले आहे. स्टार प्रवाहवरील मराठी मालिका ‘आई कुठे काय करते’ मध्ये गौरीची भुमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी (Gauri Kulkarni) तिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायमच ठेवते.
महिलांच्या हाती कोयता पुणे असुरक्षित झाले का? वसंत मोरेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
गौरी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. नुकतीच गौरीने इंस्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर केली आहे. साडीत गौरीच सौंदर्य तिच्या चाहत्यांना भारावून टाकते. या फोटोतील गौरीच्या निखळ हास्याने सर्वांनाच घायाळ केले आहे.
“अजितदादांना मुख्यमंत्री करायचं”, आमदार निलेश लंके यांचे वक्तव्य चर्चेत
सोशल मीडियावर गौरीच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव होत आहे. गौरीने वेगवेगळ्या पोझमध्ये नवं फोटोशूट केले आहे. पोस्ट शेअर करताना गौरीने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, ‘लग्नासाठी तयार झालेय पण…. दुसऱ्याच्या’. त्यामुळे ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, “पंतप्रधानांची किंमत…”
तसेच तिने केलेल्या या पोस्टवर चाहते मजेशीर कमेंट्स करत आहेत. शेअर केल्या फोटोमध्ये गौरीने साडी घातली आहे. दरम्यान, काही दिवसांपासून अभिनेत्री गौरी कुलकर्णी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून गायब झाली आहे. त्यामुळे ती सध्या काय करते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
अदानी हिडेंनबर्ग प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची सुनावणी; सेबीला दिले महत्त्वाचे आदेश