
मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला अदानी समूह भारतातल्या सर्वांत मोठ्या उद्योग समूहांपैकी एक आहे. विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे उद्योग आहेत. विमानतळ आणि बंदरांचा कारभार, उत्पादनांची आयात-निर्यात, सिमेंट उद्योग, मीडिया आणि अक्षय्य ऊर्जा या क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे. याच उद्योगांच्या जोरावर अदानीं जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले आहेत. दरम्यान हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने सादर केलेल्या अहवालामुळे अदानी चांगलेच अडचणीत आले आहेत. ‘अदानी कॉर्पोरेट इतिहासातला सर्वांत मोठा घोटाळा करत आहेत’ असा आरोप या अहवालात करण्यात आला आहे.
दोन विद्यार्थिनींनी मिळून केली ऐकिला बेदम मारहाण; पाहा व्हायरल VIDEO
यामुळे अदानी समूहाचे ( Adani Group) शेअर्स पडले असून त्यांच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झाले आहे. हिंडेनबर्गच्या अहवालात अदानी समूह ‘सामाजिक फेरफार आणि अकाउंटिंग फ्रॉड’ मध्ये गुंतले असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालानुसार १७ हजार ८०० अब्ज ($२१८ अब्ज) संपत्ती असणारा अदानी समूह अनेक वर्षांपासून “स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग फसवणूक” करत असल्याचे समोर आले आहे.
मोठी बातमी! दोन बहिणींच्या बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा
अदानी समूहावर सध्या भलेमोठे कर्ज आहे, ज्यामुळे त्यांच्यावर पाया भक्कम नसल्याची टीका होत आहे. हिंडेनबर्गच्या (Hindenburg report) अहवालात अदानींवर मनी लॉड्रींग, टॅक्स डॉलर्स चोरी व भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूहाच्या कंपन्यांनी कर्ज घेतले आणि शेअर्स तारण ठेवले यामुळे अदानी समूहाची आर्थिक स्थिती बिघडली आहे.