Site icon e लोकहित | Marathi News

अमृता फडणवीस यांचं शिक्षण किती झालं आहे? आईवडील काय काम करतात? जाणून घ्या याबद्दल माहिती

What is the education of Amrita Fadnavis? What do parents do? Learn about information

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांचे राहणीमान, त्यांची बोलण्याची पद्धती, गाणी गायची असलेली प्रचंड आवड यामुळे अमृता फडणवीस सतत चर्चेत असतात. त्यांच्या वेषभूषेवरून त्यांच्या गाण्यावरून त्यांना काही लोक मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करतात. मात्र काही लोकांना त्यांचे राहणीमान, बोलण्याची पद्धती आणि त्यांनी गायलेली गाणी प्रचंड आवडतात. त्यामुळे लोकांना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती जाणून घेण्याची देखील नेहमीच इच्छा असते. दरम्यान, आज आपण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. अमृता फडणवीसांच्या आईवडिलांबद्दल तसेच त्यांच्या शिक्षणाबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत.

जनावरं चारण्यासाठी गेलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांवर बिबट्याचा हल्ला; मुलाचा जागीच मृत्यू

अमृता फडणवीस यांचे आईवडील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्याच्या वडिलांचे नाव शरद रानडे आहे तर आईचे नाव चारू रानडे आहे. त्याचबरोबर त्यांच्या शैक्षणिक जीवनाविषयी पाहिले तर अमृता फडणवीस यांनी नागपूरच्या जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण पुण्यातील सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून पूर्ण केले असून येथून अमृता यांनी एमबीएची पदवी देखील घेतली.

राज्यभर पुन्हा एकदा पाऊस थैमान घालणार, हवामान विभागाची माहिती

अमृता फडणवीस यांना लहानपणापासूनच गाण्याची खूप आवड आहे. त्यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले. त्याचबरोबर त्यांनी अनेक ठिकाणी गाणी गायली आहेत. 2016 मध्ये आलेल्या जय गंगाजल या चित्रपटातून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटामध्ये त्यांनी ‘सब धन माती’ हे गाणे गायले होते. या गाण्याला मोठ्या प्रमाणात पसंती देखील मिळाली होती.

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा

Spread the love
Exit mobile version