PM Modi Birthday । नरेंद्र मोदींची संपत्ती किती? कोणकोणत्या मार्गाने कमावतात पैसे? वाचा

PM Modi Birthday

PM Modi Birthday । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत (India) ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली असून पंतप्रधान मोदींकडे काय-काय आहे? त्यांच्याकडे किती संपत्ती आहे? कुठे गुंतवणूक केली आहे? त्यांना किती पगार मिळतो? हे जाणून घेण्यास अनेकांना रस असतो. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. (Latest Marathi News)

Diamond League । ‘गोल्डन बॉय’ला विजेतेपदाची हुलकावणी, अवघ्या काही सेंटीमीटरने हुकली संधी

किती आहे पगार?

मागील वर्षी पीएमओ कार्यालयने (PMO Office) याबाबत संपूर्ण माहिती शेअर केली होती. त्यानुसार भारताच्या पंतप्रधानांचा पगार वर्षाला एकूण 20 लाख रुपये इतका आहे. इतकेच नाही तर मूळ वेतनाशिवाय पंतप्रधानांना देण्यात येणाऱ्या पगारामध्ये दैनिक भत्ता, खासदार भत्ता आणि इतर अनेक भत्त्यांचा समावेश असतो. त्यांनी २००२ मध्ये निवासी जमीन खरेदी केली आहे.

Maratha reservation । मराठा समाजाला आरक्षण द्या! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

स्वतःचे वाहन नाही

त्यांच्याकडे एकूण 2.23 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोदींकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नसून गुजरातमधील गांधीनगर येथे त्यांच्या मालकीची जमीन होती, जी त्यांनी दान केली आहे. इतकेच नाही तर पंतप्रधान मोदींकडे स्वतःचे कोणतेही वाहन नाही. त्याच्याकडे 1.73 लाख रुपये किमतीच्या एकूण चार सोन्याच्या अंगठ्या होत्या.

Sambhaji Bhide । “… तर जेलमध्ये टाकून चक्की पिसायला लावू”; ‘या’ बड्या नेत्याचा संभाजी भिडेंना इशारा

बचत

जर नरेंद्र मोदी यांच्या बचतीबद्दल बोलायचे झाले तर त्यांची पोस्ट ऑफिसमध्ये 9,05,105 रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे तसेच 1,89,305 रुपयांची जीवन विमा पॉलिसी आहे.

Raju Shetti । परराज्यातील ऊस निर्यातबंदीच्या आदेशावरून राजू शेट्टी आक्रमक! म्हणाले; “हिंमत असेल तर..”

Spread the love