
Health Tips । धावपळीच्या जीवनात अनेकांना आपल्या आरोग्याकडे (Health) लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांना वेगवेगळे आजार होतात. अनेकदा डॉक्टर रुग्णांना अंडी (Eggs) खाण्याचा सल्ला देतात. कारण अंड्यामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड आढळत असल्याने ते आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. अनेक आजार अंड्यामुळे बरे होतात. (Latest marathi news)
अंडी आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असल्याने अनेकजण त्याचे नियमित सेवन करतात. जर तुम्हीही रोज अंडी खात असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे. अनेकांना अंड्यासोबत कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत? याची माहिती नसते. काही पदार्थ अंड्यासोबत खाल्ले तर आरोग्यावर वाईट परिणाम होतात. जाणून घ्या सविस्तर.
Manipur । पुन्हा हिंसाचाराचा भडका! संतप्त जमावाकडून मुख्यमंत्र्यांचं घर पेटवण्याचा प्रयत्न
केळी
अंडी आणि केळी हे दोन्ही पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व आढळतात. परंतु हे दोन्ही पदार्थ चुकूनही एकत्र खाऊ नये. कारण यामुळे आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे एक ते दोन तासांच्या अंतराने अंडी किंवा केळी खावीत.
Havaman Andaj । सावधान! राज्यात विजांच्या कडकडाटासह कोसळणार मुसळधार पाऊस; जाणून घ्या हवामान अंदाज
मिठाई
तसेच अंड्यांसोबत मिठाई खाऊ नये. जर जास्त साखर असणारे पदार्थ अंड्यांसोबत खाल्ले तर पोटाला नुकसान होते. या दोन्ही पदार्थांमध्ये कमीत कमी एक तासाचे अंतर असावे.
Rakhi Sawant । राखी सावंतने प्रसिद्ध दिग्दर्शकाकडे केली ‘ही’ मोठी मागणी; वाचून तुम्ही व्हाल थक्क
चहा आणि कॉफी
अंड्यासोबत चहा किंवा कॉफी यांसारख्या कॅफिन असणाऱ्या गोष्टींचे टाळावे. नाहीतर पचनक्रिया बिघडते. कॅफिन असणारे पदार्थ अंड्यातील पोषक तत्वे शोषून घेतात. त्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता होते.
सोयाबीन आणि सोया प्रोडक्ट्स
सोयाबीन आणि सोया प्रोडक्ट्समध्ये उच्च प्रथिने आढळत असल्याने हे दोन्ही पदार्थ एकत्र न खाण्याचा सल्ला देण्यात येतो. जर तुम्ही हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ले तर शरीरात जास्त प्रमाणात प्रथिने पोहोचतात. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.
Ganpati Visarjan । अतिशय धक्कादायक घटना! गणेश विसर्जनाच्या वेळी युवक गेला पाण्यात वाहून