Samriddhi Highway Accident। समृद्धी महामार्ग अपघाताचे केंद्र बनले (Accident On Samriddhi Highway) आहे. सतत या ठिकाणी अपघात घडत असतात. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अनेकांचे संसार उध्वस्त होतात. संभाजीनगरच्या वैजापूर येथे काल रात्री समृद्धी महामार्गावर ( Samriddhi Highway) एक भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात जागीच 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, संभाजीनगरच्या वैजापूर जवळील आगर सायगाव या ठिकाणी एक ट्रक थांबलेला होता. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव खाजगी बसने या ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बस दूरवर जाऊन पलटी झाली आणि या अपघातात बसमधील जवळपास 12 प्रवासी जागीच ठार झाले तर 20 ते 22 प्रवासी जखमी झाले आहेत. (Accident News)
सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका 11 वर्षाच्या लहान मुलाने हा अपघात कसा घडला ते सांगितले आहे. हा मुलगा या बसमधून त्याचा भाऊ आणि आईवडीलासोबत प्रवास करत होता. रात्री 12.30 नंतर हा अपघात झाला असं त्या चिमुरड्याच मत आहे. आमची बस चालली होती आणि आमच्यामागे एक ट्रक होता. तसेच ट्रकच्या मागे एक आरटीओची गाडी येत होती. ही गाडी ट्रकचा पाठलाग करत होती.
ट्रकने वेग वाढवून आमच्या बसला ओव्हरटेक केले. त्यानंतर आरटीओची जीप पुढे गेली. परंतु एक जीप थेट ट्रकच्यासमोर आडवी झाली. त्यामुळे ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने तो जागीच थांबला. ट्रक थांबताच आमची बस या ट्रकवर जाऊन आदळली आणि अपघात झाला, असे या लहान मुलाने सांगितलं. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये बसचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
Ranbir Kapoor । आलिया भट्ट बद्दल रणबीर कपूरने केला मोठा खुलासा; म्हणाला, “ती दररोज…”