
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव व पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. काल (दि.17) झालेल्या या निर्णयाने मागील साठ वर्षांचे ठाकरे व शिवसेना हे समीकरण संपुष्टात आले आहे. यामुळे ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज तातडीने पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला ठाकरे गटातील सर्व आमदार, खासदार व नेते उपस्थित राहणार आहेत. आज (दि.18) मातोश्रीवर एक वाजता ही बैठक होणार आहे.
मोठी बातमी! ‘मिर्झापुर’ फेम शाहनवाज प्रधान यांचे निधन
शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्या पासून उद्धव ठाकरे यांची पुढची भूमिका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरच उद्धव ठाकरेंनी आज पक्षाची महत्वाची बैठक बोलावली आहे. आता पक्षाची पुढची भूमिका काय असणार यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.
या बैठकीसाठी मतदारसंघात असलेले सर्व आमदार आणि खासदार तत्काळ मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्वव ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच न्यायालयाच्या निर्णयाआधी निर्णय देण्याची निवडणूक आयोगाने ( Election commission) एवढी घाई का केली? असे देखील उद्धव ठाकरेंनी म्हंटले आहे.
ठाकरेंना अजून एक मोठा धक्का! ठाकरे गटाच्या खासदाराने दिले शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र