
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्रचाळ घोटाळा प्रकरणी 8 ऑगस्ट पर्यंत ईडी ची कोठडी सुनावण्यात आली आहे. नंतर त्यांच्या पत्नी वर्षा (Varsha Raut) राऊतांची काल ८ तासांहून अधिक काळ ईडीकडून चौकशी झाली. ईडीच्या चौकशीनंतर रात्री उशिरा माध्यमांशी बोलताना वर्षा राऊतांनी यावर प्रतिक्रिया दिली. “काहीही झालं तरी आम्ही शिवसेना पक्ष सोडणार नाही, आम्ही कायम उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत”. असं मत त्यांनी मांडल.
नंतर पुढे वर्षा राऊत म्हणाल्या, “काहीही झालं तरी आम्ही शिवसेना पक्ष सोडणार नाही. आम्ही कायम उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत. मला पुन्हा ईडी चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही. मात्र, ईडीने पुन्हा चौकशीला बोलावलं तरी मी चौकशीसाठी पुन्हा हजर राहीन.”
दरम्यान, यापूर्वी देखील वेगवेगळ्या प्रकरणासाठी वर्षा राऊत यांची चौकशी करण्यात आली होती. याआधीही ४ जानेवारीला ईडीने चौकशी केली होती. ती चौकशी पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित होती.