माहिती तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे आजकाल आपण घरी बसून देखील जेवण मागवू शकतो. त्यासाठी खास हॉटेलमध्ये जाण्याची गरजही आता उरली नाही. यामुळे बहुतांश लोक स्विगी व झोमॅटो वरून जेवण मागवतात. स्विगी व झोमॅटोचे ( Swiggy & Zomato) भारतात भरपूर प्रमाणात ग्राहक आहेत. पुण्यातील एका ग्राहकाने तर वर्षभरात चक्क 28 लाखांचे जेवण झोमॅटोवरून ऑर्डर केल्याची माहिती समोर येत आहे. तेजस असे या ग्राहकाचे नाव असून झोमॅटोने जाहीर केलेल्या अहवालात याबद्दल सांगण्यात आले आहे.
“…म्हणून चंद्रकांत पाटील भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यास अनुपस्थित”
या अहवालानुसार ग्राहकांनी यावर्षी खाण्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. तेजस या ग्राहकाने एकाच ऑर्डर मध्ये 25 हजरांपेक्षा जास्त पिझ्झा ऑर्डर केल्याचे देखील समोर आले आहे. झोमॅटोच्या 2022 ट्रेंड नुसार बिर्याणी ( Biryani) हा लोकांचा सर्वात आवडता अन्नपदार्थ आहे. झोमॅटोच्या ग्राहकांनी दर 1 मिनिटाला 186 बिर्याणीची ऑर्डर केली आहे. यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा आवडता पदार्थ पिझ्झा (Pizza) आहे. ग्राहकांनी प्रत्येक मिनिटाला 139 पिझ्झा ऑर्डर केले आहेत.
गूगलवर चुकूनसुद्धा सर्च करू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा खाल जेलची हवा
दिल्लीतील एका ग्राहकाने तर वर्षभरात झोमॅटो अँप वरून 3300 वेळा जेवण ऑर्डर केले आहे. याशिवाय आणखी एका ग्राहकाने वर्षभरात 1098 केक ऑर्डर केले आहेत. फक्त झोमॅटो नाही तर स्विगी वर देखील अशीच परिस्थिती आहे. 2022 मध्ये पुण्यातील एका बॉसने आपल्या सहकाऱ्यांसाठी तब्बल 71000 रुपयांचे खाद्यपदार्थ ऑर्डर केले होते. यामध्ये फ्राईज आणि बर्गर यांचा समावेश होता.
ठाकरेंच्या घरात सनई चौघडा वाजणार; आदित्य ठाकरेंचं ‘या’ वर्षी लग्न होणार?