Ajit Pawar । मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पद नको, तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी देण्याची मागणी केली होती. अशातच आता पुन्हा एकदा त्यांनी मागणीवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बारामती (Baramati) येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते. (Latest Marathi News)
देशभरात तुफान पाऊस; कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी; पाहा धक्कादायक व्हिडीओ
बोलताना पवार म्हणाले की, ‘ मी आजपर्यंत अनेक पदांवर काम केले आहे. आता मला संघटनेत काम करायचे असेल तर त्यात चुकीचे काय आहे? छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही त्यांचे मत मांडले आहे. मी माझं मत पक्षाच्या व्यासपीठावर मांडले होते. यावर आता पक्षच निर्णय घेईल, असेही स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. त्यामुळे आता पक्ष (NCP) काय निर्णय घेतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
धक्कादायक घटना! महिला कारघेऊन रस्त्याने चालली होती अचानक आला मोठा पूर अन्.. पाहा थरकाप उडवणारा VIDEO
‘कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्यासोबत मी बोललो. त्यांच्याही काही योजना आहेत, त्या जाणून घेतल्या. काही योजना या फक्त निवडणुका जिंकण्यासाठी सुरु केलेल्या असतात तर काही जनतेच्या फायद्यासाठी असतात. तसेच काही योजना घोषित करून मागे घ्याव्या लागतात. कारण योजना सुरु करत असताना त्या राज्याची आर्थिक क्षमता तेवढी असावी,’ असे अजित पवार म्हणाले.
पुणे-सोलापूर हायवेवर ट्रक, कार आणि बाईकचा भीषण अपघात; ९ जण जखमी