व्हॉट्सअॅपने आणले भन्नाट फिचर! चुकीचा टाईप झालेला मेसेज करता येणार एडिट; जाणून घ्या सविस्तर…

WhatsApp brought a wonderful feature! A mistyped message can be edited; Know more...

व्हॉट्सअॅप ( Whatsapp) हे सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन फिचर्स आणले आहेत. यामुळे ग्राहकांना एखाद्याला केलेला मेसेज एडिट (edit message feature) करता येणार आहे आणि एखादे अतिमहत्त्वाचे चॅट लॉक (Chat lock) करून ठेवता येणार आहे. व्हॉट्सअॅपच्या या दोन नवीन फिचर्सची सध्या सगळीकडे अगदी तुफान चर्चा सुरू आहे.

मेंढ्या घेऊन जाणाऱ्या मालमोटारीचा भीषण अपघात, पाच लोकांसह १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू

आतापर्यंत व्हॉट्सअॅप वर केलेला मेसेज चुकला तर तो मेसेज delete for everyone करून पुन्हा type करावा लागत होता. मात्र व्हॉट्सअॅपच्या अपडेटेड फिचर नुसार तो मेसेज तिथल्या तिथं एडिट करता येणार आहे. सध्या काही लोकांच्या मोबाईलवर हे फिचर आले असून उर्वरित लोकांच्या मोबाईलवर देखील लवकरच येणार आहे. दरम्यान या फिचर द्वारे मेसेज एडिट करण्यासाठी फक्त १५ मिनिटांच्या वेळेची मर्यादा असणार आहे. त्याहून अधिक काळाचे मेसेज यावर एडिट करता येणार नाहीत.

फायनलआधीच चेन्नईच्या ‘या’ बड्या खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, “मला समोर मुंबईची टीम नकोय”

असा मेसेज एडिट करता येणार

१) सर्वप्रथम व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट करा.
२) एडिट करायचा मेसेज सिलेक्ट करा.
३) मेसेज एडिट करण्यासाठी तुम्हाला तो मेसेज लॉन्ग टॅप करा.
४) येथे तुम्हाला एडिट मेसेजचा पर्याय दिसेल.
५) त्याठिकाणी एडिट मेसेजवर टॅप केल्यानंतर तुम्ही पाठवलेल्या मेसेजमध्ये बदल करु शकता.

याशिवाय व्हॉट्सअॅपने चॅट लॉकचे देखील फिचर आणले आहे. या फिचरमधून तुम्ही अतिशय महत्त्वाचे किंवा संवेदनशील चॅट लॉक करू

Murder | प्रेयसीच्या छातीत, पोटात चाकूने वार केले… शरीराचे तुकडे केले आणि त्यानंतर केलेले कृत्य वाचून तुमच्याही अंगावर येईल काटा!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *