व्हॉट्सअॅप (WhatsApp) युजरसाठी आनंदाची बातमी (news) समोर आली आहे. सोशल मीडियामध्ये (Social Media) सर्वात कोणते लोकप्रिय माध्यम असेल तर ते व्हाट्सॲप आहे. त्यामुळे फेसबुकच्या (Facebook) मालकीचे असलेले व्हाट्सॲप वापरणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आपल्या युजरला व्हाट्सॲप वापरताना अनेक सुविधा मिळाव्यात म्हणून व्हाट्सॲप नवनवीन हटके आणि धमाकेदार फीचर्स (Features) आणत आहे.
मागच्या काही दिवसापूर्वी असे फिचर लाँच केले आहे की, एकाच नंबरवरुन तुम्हाला दोन व्हॉट्सअॅप सुरु करता येणार आहेत. यानंतर पुन्हा एकदा व्हॉट्सॲपने भन्नाट फीचर आणले आहे. सध्या कंपनीने iOS युजर्स फोटोवर लिहिलेला मजकूर कॉपी करू शकतील असे फीचर आणले आहे. हे फीचर आयओएसमध्ये यापूर्वी देखील उपलब्ध होते, मात्र WhatsApp ने ते आपल्या प्लॅटफॉर्मवर आता जोडले आहे. याच्यामुळे आता व्हॉट्सॲप युजर्सना याचा फायदा होणार आहे. या फीचरचा तपशील WABetaInfo ने शेअर केला आहे.
जर तुम्ही iOS युजर्स असाल आणि तुमच्याकडे हे फीचर उपलब्ध नसेल, तर तुम्हाला व्हॉट्सॲप अपडेट करावे लागेल. यानंतर तुम्हाला नवीन फीचर दिसेल. या फिचरच्या मदतीने तुम्हीं व्हॉट्सॲप स्टेटसवर व्हॉईस नोट्स देखील शेअर करु शकता.