Whatsapp New Feature । व्हॉट्सअ‍ॅप मध्ये नवीन फिचर आले रे…, जाणून घ्या सविस्तर

Whatsapp New Feature. A new feature has arrived in WhatsApp..., know in detail

आजकाल सोशल मीडिया ( Social Media) हे लोकांसाठी अतिशय महत्त्वाचे माध्यम बनले आहे. सोशल मीडियावरील फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या अँप्स वर लोक कायम सक्रिय असतात. जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅपचे प्रचंड युजर्स आहेत. अशातच मेटाने फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप एका छताखाली आणले आहे. या तीनही अँप्सवर एकाच वेळी नियंत्रण ठेवता येते. मेटा आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन फिचर्स अपडेट करत असते. ( Whatsapp New Feature)

Gautami Patil । गौतमी पाटीलला चाहत्यांकडून खास गिफ्ट; सोशल मीडियावरची पोस्ट चर्चेत!

मेटाने सध्या व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी मोठे फिचर अपडेट आणले आहे. या नवीन फिचरनुसार तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप लॉगआऊट करणे शक्य होणार आहे. फेसबुक, इंस्टाग्राम प्रमाणे आता व्हॉट्सअ‍ॅप सुद्धा लॉगआऊट करता येणार याचा फायदा युजर्सना होणार आहे. हे नवीन फिचर व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीचा भाग असणार आहे. यासाठी युजर्सकडून खूप दिवसांपासून मागणी करण्यात येत होती. परंतु मेटाने हे फिचर आणल्यामुळे युजर्समध्ये आता आनंदाचे वातावरण आहे. ( Whatsapp logout feature)

खुशखबर! शेतकऱ्यांना आता सवलतीच्या दरात ड्रोन मिळणार; कृषिमंत्र्यांनी केली घोषणा

फोनमध्ये इंटरनेटची सुविधा असल्याने आपण सतत व्हॉट्सअ‍ॅपवर सक्रिय राहतो. दिवसाचे पूर्ण २४ तास म्हंटल तरी आपण व्हॉट्सअ‍ॅप वापरतो. व्हॉट्सअ‍ॅपवर सतत येणाऱ्या मेसेजेसमुळे नजर कायम फोनवरच राहते. यामुळे कामात लक्ष लागत नाही. तसेच distraction होते. एवढंच नाही तर सततच्या मोबाईल वापराने वैयक्तिक आयुष्य देखील कमी झाले आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लॉगआऊटची सुविधा हवी. अशी युजर्सकडून मागणी करण्यात येत होती.

Rishabh Pant । मोठी बातमी! ऋषभ पंत याच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *