Fertilizer Seeds Complaints । बोगस बियाणे आणि खतांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक जारी, आता 24 तास सुरु राहील सेवा

WhatsApp number issued for bogus seeds and fertilizers complaint, now 24 hours service

Fertilizer Seeds Complaints । राज्यात यावर्षी पाऊस (Rain in Maharashtra) चांगला झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पेरणीची लगबग सुरु आहे. शेतकरी बियाणे विक्रेत्यांकडे (Seed sellers) गर्दी करू लागले आहेत. परंतु शेतकऱ्यांची विक्रेत्यांकडून बियाणे आणि खते खरेदी करताना सर्रास फसवणूक केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. फसवणूक झाली तर या शेतकऱ्यांना तक्रार कुठे करावी ते समजत नाही. (Latest Marathi News)

Ajit Pawar | “शरद पवारांनी मला राजकारण शिकवले नाही,” अजितदादांनी केला खळबळजनक गौप्यस्फोट

याच शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण शेतकऱ्यांची लूट थांबावी यासाठी सरकारने पाऊले उचलली आहेत. खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक (Fertilizer Seeds Complaint Number) जारी केला आहे. 9822446655 या नंबरवर तुम्ही गोपनीय पद्धतीने तक्रार करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर 24 तास सेवा सुरू राहणार आहे.

Tomato Price। टॉमॅटो महाग वाटत असतील तर खाऊ नका, भाजप मंत्र्याच्या अजब सल्ल्याने खळबळ

तुम्हाला तक्रार लेखी स्वरूपात द्यावी लागणार आहे. तसेच तक्रार नोंदवताना शेतकऱ्यांनी आपले नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक पाठवावा. तक्रारीचा फोटो तुम्हाला व्हॉट्सऍप हेल्पलाइनवर पाठवावे लागणार आहे. समजा जर एखाद्या शेतकऱ्याला तक्रार तोंडी द्यायची असेल तर 8446117500 / 8446221750 किंवा 8446331750 या नंबरवर तक्रार करता येऊ शकते.

ITBP Recruitment । दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, महिन्याला मिळणार 69 हजार पगार

काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी खताची लिंकिंग करणाऱ्या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी तात्काळ व्हॉट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले होते. तातडीने त्यावर अंमलबाजवणी करण्यात आली आहे.

Milk Price | राज्य सरकारची दूध दरवाढ खोटी! दरवाढ करूनही मिळतोय ‘इतकाच’ दर

Spread the love