
मुंबई : गेल्या दीड तासापासून व्हॉट्सअॅप (WhatsApp) बंद पडले होते ते आता सुरु झाले आहे. व्हॉट्सअॅप सुरु झाले असले तरी अजूनही काही प्रॉब्लेम येत आहेत. भारतातील (India) काही शहरांत व्हॉट्सअॅपची सेवा सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
गेल्या दीड तासापासून इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचं सर्व्हर डाऊन झाला होता. यामुळे जगभरातील व्हॉट्सअॅपची सेवा बंद पडली होती. अशा तक्रारी अनेक युजर्सनी केल्या होत्या.
मोठी बातमी! रेल्वेचा मोठा अपघात, 15-20 डब्बे रुळावरून घसरले
आता या समस्येबाबत मेटा (Meta) कंपनीने स्पष्टीकरणंही दिलं आहे. काही तांत्रिक कारणामुळे सर्व्हर डाऊन झाल्याचं सांगण्यात येत आहे. मेटाचे इंजिनिअर्स यावर काम करत असल्याची माहिती देखील सांगण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत साजरी केली दिवाळी, पंधरा दिवसांत सरकारकडून नुकसान भरपाईची मागणी